ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उन्हाळी शिबिरात रमले विसापुरातील विद्यार्थी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूरच्या वतीने चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विसापूर येथे दि. २९ एप्रिल २०२४ ते ८ मे २०२४ पर्यंत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत मोबईल गेमकडे वळलेले विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून मैदानी व शारीरिक कसरतीकडे वळविण्यासाठी घेण्यात आलेले अभिनव उपक्रम चिंतामणी विद्यालय यशस्वी झाल्याचे दिसून येत होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. २९ एप्रिलला सकाळी ७-०० वाजता पार पडला होता.

    अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत दोंतुलवार तर विशेष अतिथी म्हणून प्रा. संतोषकुमार शर्मा योग शिक्षक पोभूर्णा, राजेश कैथवास डान्स शिक्षक बल्लारपूर, मनोज डे कराटे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट होल्डर, चंद्रकांत पावडे वैदिक मॅथ्स शिक्षक उपस्थित होते.

        या शिबिरात योगा, कराटे, डान्स , इंग्लिश स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, आर्ट अँड क्राफ्ट्स, बेसिक मॅथ्स, वैदिक मॅथ्स इत्यादी शिकविण्यात येत असल्याने विसापुरातिल विद्यार्थी चांगलेच रमल्याचे दिसून येत आहेत.

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांनी शहरी विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे उन्हाळी शिबिर घेतले जाते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून मागच्या वर्षा पासून विसापूर येथे चिंतामणी विद्यालयाच्या वतीने मोफत शिबिर घेतल्या जात आहे. यामध्ये त्यांचा सर्वांगिक विकास व्हावा त्यांच्या उन्हाळी सुट्यांचा सदुपयोग वाव्हा करीता सदर शिबराची आयोजन करण्यात आले असे मत व्यक्त केले. यावेळी गावातील बहुसंख्य विद्यार्थी उन्हाळी शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. या करीता चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विसापूरचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सदर प्रशिक्षणात शिबिराचे लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून हातभार लावत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये