दुर्गाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दिनांक 19/02/2025 ला मौज दुर्गाडी येथे 395 वी शिवजयंती व शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबाराव खडसे, उद्घाटक श्री रामचंद्र ठाकरे आणि सत्कार मुर्ती श्री दौलत धांडे प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिल पाटील खडसे पो.पा.दुर्गाडी,संजय काशीनाथ खडसे,संजय महाजन खडसे,करण ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष,मनोहर वानखेडे,दिनेश खडसे, संतोष देवतळे,गावातील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.
सकाळी 5.30 वाजता प्रभातफेरी,ग्राम स्वच्छता,व महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.59 महिला स्पर्धेत सहभागी झाल्या. रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुर्गाडी चे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख श्री शंकर तलांडे सर,श्री सुंदरलाल गेडाम सर, श्री विनोद किन्नाके सर, श्री यादव गुरनुले सर, श्री नरेश तोडासे सर चनई, श्री संजय मरापे सर मेहनत घेतली.
संध्याकाळी ठिक 7 वाजता शिवचरित्र व्याख्यान प्रा.विठ्ठल आवंडे सर, श्री सुभाष बेरड उ.श्रे.मुख्याध्यपक कढोली, श्री किशोर मंदे सर उपस्थित झाले.गावाच्या वतीने वक्त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.त्या नंतर 8 वाजता व्याख्यान सुरू झाले.आणि अकरा वाजता कार्यक्रमाचं समारोप करण्यात आले.