चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

खा. धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

विविध ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट

खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य रविवारी ता. ४ सकाळी ७. ३० वाल्मिकी समाजासोबत केक कापून आनंद साजरा करणार आहे. त्यानंतर सकाळी ८  वाजता वरोरा येथील निवासस्थानी कार्यकत्यांसोबत वाढदिवस साजरा, ११ वाजता वरोरा येथे मोनू चिमुरकर यांच्या  हॉटेल ग्रीनचे उदघाटन, ११.२५ वाजता रत्नमाला चौक वरोरा येथे शिलाई मशीन वाटप, भद्रावती येथील ११. ३० वाजता सेलिब्रेशन हॉल येथे कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा, सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे  ११. ४५ वाजता टीशर्ट व अन्न वाटप, दुर्गापूर येथील आंबेडकर पुतळा जवळ १२ वाजता साडी वाटप,  जिल्हा स्टेडिअमजवळ चंद्रपूर येथे दुपारी १२. ३० वाजता जनसंपर्क, रघाताटे कॉम्पलेक्स आकाशवाणी समोर दुपारी ४ वाजता मल्टीपेशालिटी दंत रुग्णालयाचे उदघाटन, सायंकाळी ६ वाजता वरोराकडे रवाना होणार आहे. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button