ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा येथील बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी कार्यालय परिसराचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नव्याने स्थलांतरित झालेल्या “बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी कार्यालय (एलडीएम ऑफिस), वर्धा” चा उद्घाटन समारंभ मंगळवार, ०८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता गीता भवन, गोपुरी चौक, नागपूर रोड, वर्धा-४४२ ००१ येथे स्थलांतरित झालेल्या नवीन कार्यालय परिसरात यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. जितिन रहमान (आय.ए.एस.), मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा आणि श्री. नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त जिल्हाधिकारी, वर्धा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्रमाला संबोधित केले आणि आपल्या जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राची कामगिरी सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी सरांनी असे नमूद केले की जिल्हा अग्रणी बँक ही सरकार पुरस्कृत योजना, आर्थिक समावेशन योजना आणि जिल्हा पतपुरवठा योजना साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते व त्यांना पुढील वर्षांसाठी शुभेच्छाही दिल्या.

 या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया विदर्भ झोनचे आंचलिक प्रबंधक श्री. कुश गणहोत्रा, उप आंचलिक प्रबंधक श्री. जितेंद्र मस्तमौला, एसएमईसीसी वर्धा येथील सहायक महाव्यवस्थापक श्री. सम्राट वर्मा आणि श्री. सुशांत पाटील डीडीएम नाबार्ड , जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री. चेतन शिरभाते , श्री. पुरुषोत्तम दिवरे आदी यांची उपस्थिती होती. आंचलिक प्रबंधक श्री. कुश गणोत्रा यांनी जिल्हा कार्यालय आणि स्टार कृषी विकास केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कुशल काम करण्याकरिता प्रोस्ताहित केले व त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि विविध बँकेचे जिल्हा प्रतिनिधी तसेच इतर शासकीय विभागांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते, ज्यामुळे हा प्रसंग संस्मरणीय आणि यशस्वी रित्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये