ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू

घोडपेठ गावाजवळील घटना : इसमाची ओळख अनोळखीच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    तालुक्यातील घोडपेठ गावालगत असलेल्या रेल्वे लाईन जवळ एका 30 ते 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह दिनांक 17 रोज ला आढळून आला. सदर इसमाचा मृत्यू हा रेल्वेच्या धडकेने झाल्याचा अंदाज असून या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.

सदर इसम हा अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा असून उंची पाच फूट सहा इंच आहे. त्याने काळ्या रंगाचा फुलपॅट परिधान केला असून त्याचे अंगावर शर्ट नाही. ज्यांना या इसमाची माहिती असेल त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये