देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे बाईक रॅली काढून मतदान जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा मतदारसंघातील क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध उपक्रमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली.
SVEEP उपक्रमांतर्गत नगरपरिषद सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा , तहसील कार्यालय सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा, पंचायत समिती सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तसेच सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहभागामधून आज दिनांक 16 नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी 10 वाजता दोन्ही शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील नागरिकांकडून मिळाला आहे.
आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही संदेश मतदाराला देण्यात आला, सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी ” GO VOTE” या नावाचे फलक घेऊन मतदान जनजागृती व्हावी अश्या आशायाचा संदेश मतदारांना दिला आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांना आवाहन सुद्धा केले.
मतदारांना रंजकपने आणि उत्साहाने महत्वपूर्ण संदेश देण्यात आले त्यातील काही महत्वाचे वाक्ये पुढीलप्रमाणे,”गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत, सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत”
लोकशाहीतील समानतेचे ही मूल्य अधिक बळकट करूया, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया.
“आपलं पहिलं मत,
म्हणजे देशाच्या जडणवीतला पहिले योगदान”
“जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या, माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडून या”
“प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू”
आजच्या या कार्यक्रमाला मा. तहसीलदार सिंदखेड राजा श्री अजित दिवटे, मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ,मा. मुख्याधिकारी देऊळगाव राजा नगरपरिषद अरुण मोकळ, मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री प्रशांत व्हटकर, मा. निवडणुक नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री मनोज सातव,मा.निवडणुक नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्री प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री प्रवीणकुमार वराडे,मा . डॉटर आसमा मुजावर नायब तहसीलदार सिंदखेडराजा मा नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी,शिक्षक उपस्थित होते.
त्यामध्ये श्री वाघमारे (गटशिक्षणाधिकारी), प्रसार माध्यम नोडल अधिकारी श्री अंकुश म्हस्के, नोडल अधिकारी संजय सोनुने श्री रंगनाथ गावडे,SVEEP नोडल अधिकारी श्री मुसदवाले, विस्तार अधिकारी श्री दराडे,श्री सुरेश तायडे, श्री खरात, श्री राखोंडे, गैबीनंद घुगे, अरुण खेडेकर, कु.जाधव (केंद्रप्रमुख) दीपक गिते, मिरटकर, जिजामाता विद्यालय कर्मचारी व स्थानिक शाळांचे शिक्षकउपस्थित होते.