ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात केवळ ४० होर्डीग अनधिकृत

केवळ १३७ होर्डीगला मनपाची परवानगी

  चांदा ब्लास्ट

        मुंबई घाटकोपर येथील अवाढय व होर्डीग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात अवैध होडींग धारक व त्यांना चिरीमिरी घेऊन पोसणारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या घटनेपासून बोध घेण्यापेक्षा वेळ मारुन नेण्याची मनपाची भुमिका अतिशय संतापदायक ठरत असून चंद्रपुरातील होर्डीग माफीयांना संरक्षण देणारी आहे.

     चंद्रपूर शहरात जवळपास ३०० च्यावर होर्डीग शहरभर लावण्यात आले आहे. यातील केवळ १३७ होर्डीगला मनपाची परवानगी आहे. मनपा आयुक्त म्हणतात शहरात केवळ ४० होर्डीग अनधिकृत आहे. मग बाकीचे शेकडो होडींगच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात काही मोजकेच होर्डीग व्यवसायीक आहे. त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन नाममात्र होर्डीगची परवानगी घेऊन शेकडो अनधिकृत होर्डीग लावून लाखो रुपये कमाई करीत आहे.

       अवैध होर्डीगसाठी व्यवसायीसोबत मनपा अधिकारी देखील जवाबदार असल्याने याची चौकशी करुन मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्ट्रक्चरल ऑडीट पाहणी न करता पैसे घेऊन देण्यात आली असल्याने होर्डीग जनतेसाठी धोकादायक बनले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये