ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नामदेवराव बाबाजी गावतुरे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अभिनंदन करीत केली दीर्घायुष्याची कामना

चांदा ब्लास्ट

मूल शहरातील रामलीला भवन येथे नामदेवराव बाबाजी गावतुरे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अभिनंदन करीत दीर्घायुष्याची कामना केली.
मुल चे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक  नामदेवराव बाबाची गावतुरे (,डॉक्टर राकेश गावतुरे यांचे वडील आणि डॉक्टर अभिलाष गावतुरे यांचे सासरे) यांचा वाढदिवस आपतेष्टांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या होत्या.  त्याचबरोबर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ महाडोळे, दीपक पाटील वाढईं ,प्रल्हादजी गावंडे, उमाजी दादा मंडलवार, प्राध्यापक गुलाब मोरे, प्राध्यापक कराडे, डॉ. सचिन भेदे, प्राध्यापक विजय लोणबले, मडावी सर आणि माननीय नीपचंदजी शेरकी तसेच  गावतुरे यांच्या पत्नी शशिकला गावतुरे, कुटुंबीय प्रशांत गावतुरे, सुना प्रीती गावतुरे, अल्का गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे आणि डॉ. अभिलाषा गावतुरे उपस्थित होते. कार्यक्रम चे संचालन ऍड प्रशांत सोनुर्ले यानी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावतुरे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान. प्रतिभाताई धानोरकर यांनी गावतुरे यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. त्यांनी श्री गावतुरे यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो अशा  शुभेच्छा दिल्या व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी श्री गावतुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या कुटुंबियांचे आणि मित्र-मैत्रिणींचे आभार मानले. त्यांनी सर्वांना एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये