ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगनाळा शाळेचे दुहेरी यश 

नवोदय विद्यालयासाठी दोन विद्यार्थी पात्र 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

जुगनाळा – ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुगनाळा शाळेचे ओमखेत शालिकराम मैंद व युग विजय जगनकर हे दोन्ही विद्यार्थी यंदाच्या नवोदय विद्यालयाच्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांचा निवडीचा मार्ग सुकर झालेला आहे.

कुशाग्र बुद्धीच्या जोरावर ओमखेत तर प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रम करीत युग या दोन्ही विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले आहे.

त्यांच्या या यशाची परिसरात चर्चा असुन सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मान. गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे तसेच वि.अधिकारी गायत्री तोराम यांनी विध्यार्थ्यी व शाळेचे अभिनंदन केले आहे.

सदर विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय आई- वडील तसेच गुरुजन वर्गाना दिले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन प्रधान, वर्ग शिक्षिका प्रभा गणवीर, संगीता वैद्य, गोवर्धन टिकले, योगराज बोरकुटे, धनपाल दमके, स्वाती लाडेकर तसेच गोपाल राऊत सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्राम पंचायत. जुगनाळा वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये