ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये आज दि. 21 मार्च रोजी पदवी वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. शैक्षणिक सत्र 2022 – 23 व 23- 24 या दोन वर्षातील महाविद्यालयातील बीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी चे वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीत व राज्य गीतानी करण्यात आली.

यावेळी शैक्षणिक सत्र 2023 – 24 ची महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. अवंती अवचट ही विद्यापीठात पाचवी मिरीट आल्यामुळे पाहुण्यांच्या हस्ते तिचा सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच चालू 2024 – 25 या वर्षातील कु. प्रतीक्षा चंदनखेडे ही आय. आय. टी जाम बायोटेक्नॉलॉजी या विषयांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा पण सम्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून मा. श्री मुकेश गहलोत, एच. आर. हेड, माणिकगड सिमेंट वर्क, अल्ट्राटेक, गडचांदूर यांना विशेष निमंत्रित केले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की इतक्या ग्रामीण भागामध्ये केजी टू पीजी तसेच संशोधनास प्रोत्साहन देणारी तालुक्यातील एकमेव संस्था आहे ज्यामध्ये विद्यार्थी शिकत आहे. त्यांच्यासाठी ही मोठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली सोबत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक व शिक्षकेतर

कर्मचाऱ्यांचे तसेच संस्थेचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विठ्ठलराव थिपे, उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर होते ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून मोठे झाले पाहिजे. सातत्यपूर्ण केलेल्या मेहनतीला पर्याय नसतो, त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने स्वीकार करावा, यासाठी त्यांनी विविध उदाहरणाद्वारे अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री धनंजय गोरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री. रामचंद्र सोनपितरे, महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. डॉ. अनिस खान, प्रा. पवन चटारे, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. अजय कुमार शर्मा, डॉ. संदीप घोडिले, डॉ. उत्कर्ष मून, प्रा. चेतन वैद्य, यांचे सहकार्य लाभले तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मोलाची मदत दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव यांनी आपल्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून झालेल्या विकासाचा आढावा व भविष्यात केल्या जाणाऱ्या योजनांचा आराखडा स्पष्ट करून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल, प्रा. मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पदवी वितरण सोहळ्याचे समन्वयक प्रा. रामकृष्ण पटले यांनी केले.यावेळी मोठया संख्येत विध्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये