ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बेनिफिट ह्युमन्स ग्रुप गडचांदूर च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी साडेपाच वाजता आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी योग, शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रुपच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, उपाध्यक्षा . कृष्णा ठाकरे,. सर्व कमेटी सदस्य वैशाली पारधी, उज्वला शेरकी, अंजू विश्वास तसेच इतर सर्व योगा सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बेनिफिट ह्युमन्स ग्रुपच्या माध्यमा तून सामाजिक, आरोग्य विषयक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून सर्वांना एकत्रित करून मैत्री, एकोपा व संघटन बळकट करण्याचे कार्य संचालिका श्रीमती कुंतल चव्हाण करीत आहेत. उपस्थित सर्व योगा महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी सर्वांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये