ताज्या घडामोडी

लोकमान्य विद्यालयाची आरुषी बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरावर

लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        वर्धा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाची कु.आरुषी मंगेश बेतवार विभागस्तरावर विजयी झाली असून,ती आता अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विभाग स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालयाच्या आरुषीने सर्वप्रथम वर्धा जिल्हा त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील खेळाडूवर विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेकरीता आपले स्थान पक्के करून भद्रावतीच्या तसेच लोकमान्य विद्यालयाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आरुषीचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रिडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार,तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. आरुषीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षिका लता इंदुरकर मॅडम यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये