ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात पदवीदान समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी सत्र 23- 24 मध्ये पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या.

       या पदवीदान समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले ,प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे तसेच विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर येथील सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ.सुभाष गिरडे व डॉ. किरण कुमार मनुरे इत्यादी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

     यावेळी पदवीदान समारंभाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी आवडीचे पुढील शिक्षण घ्यावे व आपल्या पदवीचा व शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व सुजान नागरिक बनण्यासाठी करावा असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ.संजयकुमार सिंह यांनी शिक्षणामुळे संस्कारीत पिढी घडवली जात असून आपण काळाला अनुरूप उच्च शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनावे असे प्रतिपादन केले.यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांनी केले तर यावेळी तज्ञ मार्गदर्शक डॉ.सुभाष गिरडे व डॉ. किरण कुमार मनोरे यांनी पदवीनंतर काय या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

     यावेळी महाविद्यालयातील डॉ. हेमचंद दुधगवळी,डॉ. राजेश गायधनी डॉ. सत्येंद्रसिंह उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले.आभार डॉ.माया मसराम यांनी मांनले.यावेळी मागील वर्षी पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदवीदान समारंभाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये