मॅकरुन स्टूडटंस अॅकडमी ज्यु. सायन्स कॉलेज, वडगाव, चंद्रपूर चा एच. एस. सी. निकाल शंभर टक्के

चांदा ब्लास्ट
चंद्रपुरातील नामावंत मैकरुन स्टूडटंस अॅकडमी ज्यु सायन्स कॉलेज, वडगाव, चंद्रपूर येथील महाविदयालयाचा यावर्षी सुध्दा एच.एस.सी. परीक्षेचा 100 टक्के निकाल लागलेला आहे. महाविदयालयाच्या 191 विदयार्थ्यांनी परिक्षा दिलेली होती त्यामध्ये संपुर्ण विदयार्थी उत्तीर्ण झालेले आहे.
महाविदलयाने ही परंपरा मागील सुरुवाती पासून जपून ठेवलेली आहे. अलिशा कादेलवार या विदयार्थीनी 91% गुण घेतले असून तोमेश्वरी साहु हीने 85% सार्थक खडसे 84% विवेक खिरटकर 84% रुद्राणी कुंभलकर 83% ओम सुटवाने 81% मिळालेले आहे.
सुसज्य सुंदर इमारतीत शाळेच्या आवारात कलागुण निपुनः उच्च शिक्षित शिक्षक गणांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना सर्वोतापरी शिक्षण देत गुणांची भरारी मारलेली आहेत. वर्षभरात एकून 11 वेळा प्री टेस्ट घेतल्या आहेत. मुलांची विषयांतील कमजोरी निवडून त्यांचे गुण वाढविण्यासाठी वाचनन्, लिखान, उत्तर शैली याचे योग्य मार्गदर्शन केलेले आहेत.
सोमैय्या गृप तर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेचे संस्थापक / अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपध्याक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, संचालक प्रांजली रघाताटे आणि शाळेचे प्राचार्य फैयाज अहमद आणि त्यांचे शिक्षकगण ह्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले, तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी अभीनंदन केले.