ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बळीराम गोरे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील सेवा निवृत्त पोलिस अधिकारी बळीराम गोरे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दिनांक 7 मार्च चे रात्री दुःखद निधन झाले.

तालुक्यातील सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे ते प्रदीर्घ काळ अध्यक्ष होते, सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या समस्या दूर करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे, देऊळगाव राजा नगर परिषद चे सेवा निवृत्त अधिक्षक राजेन्द्र गोरे यांचे ते वडील होते.

बळीराम गोरे यांचे पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत 8 मार्च रोजी अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वच स्तरातील नागरीक उपस्थित होते.

मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी,3 मुले,1मुलगी, सूना जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये