पोलीस प्रदर्षनीचा सांगता समारोह थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान महाराश्ट्र पोलीस वर्धापन दिन/रेजींग डे (सप्ताह) साजरा करण्यात येते असून त्यादरम्यान दिनांक 04.01.2024 व दिनांक 05.01.2024 रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथे पोलीस विभागातील सर्वच शाखाचे कामकाज व जनतेस त्याचा उपयोग याकरीता वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्षनी लावण्यात आली होती. त्यामध्ये सायबर सुरक्षा, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलीस वाहने, डाॅग स्काॅड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, अंमली पदार्थ जागृती, डायल 112, दामीनी पथक/ पोलीस काका व पोलीस दीदी, होम गार्ड, फाॅरेन्सीक व्हॅन टूल किट, बॅन्ड पथक, दंगल नित्रंयण साधने यांचे एकूण 16 स्टाॅल लावण्यात आले होते. सदर प्रदर्षनी करीता वर्धा जिल्ह्यातील षाळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून जिल्हयातील सर्वच तालूक्यांमधील वेगवेगळया शाळांमधून 6700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह हजेरी लावली. तसेच षहरातील नागरीकांनी हिरहीरीने सर्व स्टाॅल्स्ला भेटी दिल्या. विद्यार्थांकरीता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
पोलीस प्रदर्शनी सांगता समारंभ दि. 05.01.2024 रोजी संध्याकाळी 06.00 वा. ते 07.00 वाजता दरम्यान पोलीस मुख्यालय, वर्धेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा लाभले तसेच मा. रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र, मा. रामदास आंबटकर, आमदार, विधान परीशद, मा. दादाराव केचे, मा. समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट विधानसभा क्षेत्र, मा.डाॅ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा क्षेत्र, मा. राहूल कर्डीले, (भाप्रसे), जिल्हाधिकारी, वर्धा यांचे प्रमूख उपस्थीतीत संपन्न झाला.
या दोन दिवसीय प्रदर्षनी दरम्यान वर्धा जिल्ह्यातील न्च्ैब्, डच्ैब् व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या 250 विद्यार्थांना मार्गदर्षन करण्यात आले. मा. प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते ई-दरबारचा लोकार्पण सोहळा व अमली पदार्थ विरोधी जागृती करण्याचे हेतूने मोहीम हाती घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे यषाकरीता मा. नूरूल हसन (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. डाॅ. सागर कवडे (म.पो.से) अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, वर्धा पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.षा., राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, पो.मू., वर्धा स.पो.नि. लक्ष्मण लोकरे, कल्याण षाखा, स.पो.नि. विनीत घागे, वाहतूक षाखा, स.पो.नि. संदीप कापडे, सायबर सेल व सर्व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.