ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     लग्नाचे आमीष दाखवून एका २१ वर्षे तरुणीशी तीन वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका युवकास तरुणीने पोलिसात केलेल्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. आशिष तुकाराम बारतीने, वय २५ वर्ष, राहणार चंदनखेडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सदर पिडीत युवती ही २०२१ मधे कामानिमित्त भद्रावती येथे आली असता सदर आरोपी हासुद्धा बाइकने भद्रावती येथे आला. त्यानंतर तुला बाजारात सोडून देतो असे म्हणत तो तिला गवराळा परीसरात घेऊन गेला व तिच्याजवळ आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. सदर युवतीने त्याला नकार दिल्यानंतर तिला स्वारी म्हणत तुला गावाला सोडून देतो असे सागुन तो तिला भद्रावतीतील एका घरी घेऊन गेला व लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आजवर तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.

मात्र त्याचे तरुणीला दिलेले लग्नाचे आश्वासन खोटे निघाल्याने सदर तरुणीने या युवकाच्या विरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार भद्रावती पोलिसांनी आशिष बारतीने या युवकावर संबंधित गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार लता वाडीवे याचे मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये