सनराईज योगा ग्रुप तर्फे जागतिक मातृत्व दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा ऍक्टिव्हिटी बेनिफिट वुमेन्स ग्रुप तर्फे 11 मे रोजी महात्मा गांधी विद्यालय च्या सभागृहात जागतिक मातृदिन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योगा ग्रुप च्या संचालिका कुंतल चव्हाण यांच्या तर्फे मातृदिनाचे औचित्य साधून एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाळू उमरे तसेच ज्योती ठाकरे उपस्थित होत्या. दरवर्षी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणाऱ्या सौ माधुरी पोतनुरवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुंतल चव्हाण यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजू ढेंगळे यांनी केले.
या स्पर्धेत सौ. संध्या डाखरे या प्रथम विजेत्या ठरल्या.
तसेच किशोरी देवतळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आणि सौ. वैशाली पारधी यांनी तृतीय विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमा करिता उपस्थित मान्यवरांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आणि सनराईज ग्रुप च्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.अंजू ढेंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.