ताज्या घडामोडी

नागभीड येथील धनंजय मेंढे यांची जबलपूर येथील प्रशिक्षण परेड कमांडर म्हणून चोख कामगिरी

केलेल्या कर्तव्य कामागिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील धनंजय चंदुजी मेंढे यांनी भारतीय स्थलांसेनेच्या पहिल्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर पासिंग आऊट सोहळा ५ ऑगस्ट २०२३रोजी जबलपूर येथील गौरीशंकर परेड ग्राउंड,१सिग्नल ट्रेनींग सेंटर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून ८७७प्रशिक्षनार्थी युवा अग्निवीर सामील झाले.
या कार्यक्रमात परेड निरीक्षण ब्रिगेडिअर श्री राहुल मलिक यांचे उपस्थितीत परेड कमांडर म्हणून प्रशिक्षनार्थी अग्निवीर नागपूर येथील श्री बिंझानी नगर महाविद्यालयातील माझी एन एन सी विद्यार्थी धनंजय चंदुजी मेंढे यांनी चोख कामगिरी बजाविली. संपूर्ण भारतातून आलेल्या यशस्वी प्रशिक्षणानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात आली.
 नागभीड येथील धनंजय चंदुजी मेंढे यांनी आपल्या केलेल्या कर्तव्य कामागिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून प्रत्येकाने त्यांचेकडून काही ज्ञान आत्मसात करून आपलें नांव देश पातळीवर उभे करावे असे त्यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी संवाद साधून पूर्ण केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये