ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीची सामोरा समोर धडक

तीन ठार तर तीन जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली पासून १० किमी.अंतरावर नांदगाव येथील मजूर व्याहाड खुर्दच्या दिशेने जात होते तर हिरापुर येथील युवक गडचिरोलीहून आपल्या स्वगावी हिरापुर येतं होते. चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकर पेट्रोल पंप समोर दोन दुचाकी स्वारांची समोरा-समोर जोरदार धडक दिल्याने २ जण जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला.३ व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत. दोन्ही दुचाकीवर तीन-तीन व्यक्ती बसले होते असे सांगितले जात आहे.

हरीश पांडुरंग सहारे वय ३५ रा. नांदगाव तालुका सिदेवाही, सागर रघुनाथ शेडमाके वय २२, राहणार हिरापुर, प्रशांत आत्राम वय ३०वर्ष रा. हिरापूर तालुका सावली मृत्यू पावले. तर जखमींमध्ये अजय विजय गोरडवार वय ३२ वर्षे रा.सावली व सुमित शेडमाके हिरापूर व प्रशांत चावरे नांदगाव गंभीर जखमी आहेत.

जखमीना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली.सावली पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे हिरापुर आणि नांदगावात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये