अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस सातारा जिल्ह्यातून अटक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे आहे की, यातील आरोपीने पो स्टे. गिरड हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून व तिचेशी जवळीक साधून दि.18.06.2022 रोजी ती घरीच असतांना तीला फुस लावून कोरा येथून तिच्या पालकाचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पो. स्टे. गिरड येथे वरील गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.
तेव्हा पासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता. तसेच आरोपी मिसिंग असल्याबाबत त्याचे वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पो स्टे गिरड येथे मिसिंग क्र.11/22 दि.13.08.22 रोजी दाखल आहे.त्यानंतर दि.20.04.2023 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला.
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई* यांचे आदेशानुसार दि.01.11.2023 ते 31.11.2023 पर्यत ऑपरेशन मुस्कान राबवून जास्तीत जास्त बालके व महिलांचा शोध घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर शोध मोहिमेदरम्यान यातील आरोपी व मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीवरून त्यांचे शोधार्थ सातारा जिल्ह्यात पोलीस पथक पाठविण्यात आले होते. त्यांनी सातारा जिल्हयातील पो. स्टे. शिरवळ हद्दीतील मौजा सांगवी गावात शोध घेतला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी दिनेश प्रकाश बावणे, वय 23 वर्षे, रा. कोरा, ता. समुद्रपूर, जि.वर्धा हे दोघेही एका कंपनीत मजुरी काम करतांना मिळून आलेत.
ते दोघेही सांगवी गावात किरायाने रूम घेऊन एकत्र राहत असल्याचे दिसून आले.आरोपीने पिडीत मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आढळून आल्यामुळे सदर गुन्ह्यात भा. द. वि. चे कलम 376(2)(एन ) व 4,6 पोक्सो ऍक्ट चे कलम वाढ करण्यात आले आहे . आरोपी व पिडीत मुलीस वर्धा येथे आणून आरोपीस रितसर अटक करून पीडित मुलीसह पुढील तपासकामी पो. स्टे. गिरड येथे हस्तान्तरीत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा, वर्धा, पो. उप नि बालाजी लालपालवाले यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,अर्चना जाधव,दिनेश बोथकर,अंकित जीभे यांनी पार पाडली आहे.
करिता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सादर आहे.