ताज्या घडामोडी

चंद्रपूर येथे भव्य मोफत मूत्र विकार शिबिर – डॉ. आनंद बैद व महावीर इंटरनॅशनल तर्फे आयोजन

चंद्रपूरचे आराध्य रतनमुनीजी महाराज साहेबांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्य होणार शिबिर

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूरचे आराध्य व जैन समाजाचे प्रसिद्ध मुनी रतनजी महाराज साहेबांच्या प्रथम पुण्य स्मरणाचे औचित्य साधुन महावीर इंटरनॅशनल शाखा चंद्रपूर व जेष्ठ मूत्र विकार तज्ज्ञ डॉ. आनंद बैद ह्यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत भव्य मूत्र विकार निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आनंद रतन युरोलॉजी क्लिनिक येथे आयोजित शिबिरात लघवी संबंधित विकार तसेच मुतखड्याशी संबंधित विकारांचे मोफत निदान करण्यात येणार असुन शिबिरार्थी रुग्णाची आवश्यकतेनुसार करण्यात येणारी रक्त तपासणी तसेच सोनोग्राफी शुल्कात 50 टक्क्यांची सूट देण्यात येणार असुन डॉक्टर रुग्णांना मोफत सेवा देणार आहेत. ह्या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर येथील जेष्ठ डॉ. महावीर सोईतकर, डॉ. अशोक भुक्ते व डॉ. सतिश तातावार ह्यांनी केले असुन  निर्मल भंडारी (9422910115), नरेश तालेरा (9823545701), पंकज जैन (9822726158), त्रिशूल बंब (9890750101) ह्यांच्याकडे शिबिरासाठी नाव नोंदणी करता येणार असल्याचे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये