प्रीतेश प्रकाश गाजेवार आय. आय. टी. जॅम परीक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जि. चंद्रपूर या ठिकाणी बी.एस्सी. तृतीय वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रीतेश प्रकाश गाजेवार याने आय. आय.टी. दिल्ली द्वारे एम.एस्सी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा साठी घेण्यात येणा-या जॅम २०२५ या परीक्षेत रसायनशास्त्र या विषयात यश प्राप्त केले असून तो हि परीक्षा चांगल्या गुणांनी उतीर्ण झाला असून तो एम.एस्सी. रसायनशास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परीस्थिती मध्ये त्याने अतिशय अवघड समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याचे या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री संदिपभाऊ गड्डमवार, मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री अनिलभाऊ स्वामी, मंडळाच्या उपाध्यक्षा आदरणीय नंदाताई अल्लुरवार, संस्थेचे सचिव आदरणीय श्री राजाबाळ पाटील संगीडवार, संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ रमाताई गड्डमवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ ए. चंद्रमौली यांनी अभिनंदन केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापक व आपल्या आई वडिलांना दिले आहे.