शालेय पोषण आहार कर्मचारी संघटने तर्फे पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने
विविध मागण्यांचे निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नुकतेच आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटने (कामगार संघटना) च्या आवाहना नुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर ठीक – ठिकाणी मोर्चा, धरणा, निदर्शने, आंदोलन करण्यात आले कॉम्रेड विनोद झोडगे पाटील राज्य महासचिव शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना आयटक यांच्या मार्गदर्शनात व कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक तथा जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वात आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना भद्रावती तालुक्यातर्फे पंचायत समिती कार्यालय भद्रावती येथे आशुतोष सपकाळ संवर्ग विकास अधिकारी (बी. डी. ओ.) यांचे प्रतिनिधी घनशाम कुटेमाटे यांना शिस्टमंडळ भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
आयटक सह देशातील कामगार कर्मचारी संघटनानी देशपातळीवर आंदोलन पुकारले आहे. केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी धोरण राबवित आहे. कामगार विरोधी ४ श्रमसहित रद्द करा, शालेय पोषण आहार कर्मचारी सर्व योजना कर्मच्याऱ्यांना किमान वेतन पेन्शन, सामाजिक सुरक्षा शालेय पोषण आहार कर्मचार्यांचे माहे मार्च, एप्रिल पासूनचे थकित इंधन बिल व मानधन त्वरित देण्यात यावे व इतर मागण्या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी मार्फत प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, सचिवालय यांना देण्यात आले.
हे निवेदन देते वेळी कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक तथा जिल्हा संघटक यांचे नेतृत्वात कॉम्रेड आशा सोपनकर, कॉम्रेड स्नेहलता देवगडे, कॉम्रेड नानेबाई बोबडे, कॉम्रेड मीना शस्रबुद्धे व इतर पदाधिकारी, सदस्य तथा शिष्टमंडळ उपस्थित होते.