गुन्हेमहाराष्ट्र

शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

चोरट्यांना पकडण्यास भद्रावती पोलीस असमर्थ

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-

शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून शहरात तीन ठिकाणी चोऱ्या करून अज्ञात चोरट्यांनी भद्रावती पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. शहरात सतत होत असलेल्या चोरांच्या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील साईलॉन समोर राहणाऱ्या निखिल रमेश गुंडावार यांच्या घरातून कपाटात ठेवलेली 70 हजार रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. निखिल गुंडावर हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परत आल्यानंतर त्यांना कपाटातील 70 हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे कपाटातील सोन्याचे दागिने सुरक्षित होते. सदर घटनेची तक्रार निखिल गुंडावर यांनी भद्रावती पोलिसात केली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील किल्ला वार्ड येथे राहत असलेल्या सुनील राचलवार यांच्या घरातून 1 लक्ष रुपयाची चोरी झाली. त्यांनी सुद्धा सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली आहे. याच दरम्यान भद्रावती येथील सुप्रसिद्ध व्यापारी मुरलीधर अग्रवाल हे पुण्याला गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली. या घटनेत अग्रवाल यांच्या घरातून जवळपास 30 ते 40 हजाराची रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर घटनेची तक्रार भद्रावरती पोलिसात करण्यात आली असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अग्रवाल यांनी भद्रावती पोलिसांना केली आहे. शहरात चोरांच्या सत्रामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे. अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अज्ञात चोरटे कैद झालेले आहेत. विशेष म्हणजे नवीन ठाणदार रुजू झाले तेव्हापासून भद्रावती शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे तसेच या चोरट्यांना पकडण्यात भद्रावती पोलीस असमर्थक ठरत असल्याचे भद्रावती येथील नागरिंकाकडून बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये