ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुद्धलेणीवरील मूर्ती विटंबना प्ररणातील आरोपीला तत्काळ अटक करा

बुद्धलेणी सिक्युरिटी ॲक्शन कमिटीची पत्रपरिषदेत मागणी

चांदा ब्लास्ट

भद्रावतीलगतच्या ऐतिहासिक विजासन लेणी येथील मूर्तीची अज्ञात माथेफिरूने ३१ डिसंेबरच्या रात्री तोडफोड करून विटंबना केली. यामुळे बौद्ध बांधवांमध्ये तीव्र संताप असून, अद्यापही या प्रकरणातील आरोपीला भद्रावती पोलिसांनी अटक केली नाही. आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बुद्धलेणी सिक्युरिटी ॲक्शन कमिटीने चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

विजासन लेणी येथे पूर्णाकृती बुद्धमूर्ती असून, अज्ञात माथेफिरून या मूर्तीची विटंबना केल्याचे उजेडात येताच भद्रावतीत जनक्षोभ उसळला. हजारो समाजबांधव रस्त्यावर आले. यानंतर भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करणे आवश्यक असताना भद्रावती पोलीस चालढकल करीत आहे. घटना उजेडात येताच पोलीस विभागाने बुद्ध मूर्तीचे पावित्र्य राखणे आवश्यक होते. परंतु, पोलीस विभागाकडून पावित्र्य राखले गेले नाही. शिवाय घटनास्थळी दाखल झालेल्या भिक्खू संघासोबतही असभ्य वर्तवणूक केली असा आरोप यावेळी करण्यात आला.

आठवडा उलटल्यानंतरही आरोपी अटकेबाहेर असल्याने हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा संशय कमिटीने व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, बुद्धलेणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या परिसरात चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा आदी मागण्याही बुद्धलेणी सिक्युरिटी ॲक्शन कमिटीने पत्रपरिषदेत केल्या आहेत. यावेळी सुरेंद्र रायपुरे, उमेश रामटेके, संतोष रामटेके, हरीश दुर्योधन, सिद्धार्थ सुमन, नाना देवगडे, अनमोल कोल्हटकर, अतुल पाटील, राहुल उमरे, कोमल रामटेके, उत्तम मेश्राम, मिलिंंद अक्साडे, ॲड. प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये