चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

कापूस ते कापड या साखळी धोरणावर टेक्स्टाईल पार्क उभारा

खा. धानोरकर यांची लोकसभेत मागणी

चांदा ब्लास्ट

विदर्भात कापूसपट्ट्याचा विकासच ‘कापूस ते कापड’ या साखळी धोरणावर विकास करणे गर्जेचे आहे. या वस्त्रोद्योगाच्या नवीन प्रकल्पासाठी सूतगिरण्या, गारमेंट्स, जिनिंग, प्रोसेसिंग प्रकल्प उभारणी व बळकटीकरण करण्याचे नियोजन करून येथील शेतकरी उपयुक्त बाजारपेठ व येथील बेरोजगारांना नोकरी काम देण्यासाठी  चंद्रपूर – यवतमाळ लोकसभा क्षेत्रात टेक्स्टाईल पार्क उभारा उभारण्याची लोकहितकारी मागणी आज लोकसभेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.  

                   विदर्भातील विशेषतः चंद्रपूर – यवतमाळ लोकसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस , सोयाबीन तसेच धानाचे पीक घेतात. या भागात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणत घेऊन देखील टेक्स्टाईल पार्क अद्याप उभारण्यात आलेला नाही. हा भाग नक्षलग्रस्त तथा आदिवासी बहुल आहे. त्यामुळे या भागात उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदाराला प्रोत्साहन देण्यासाठी २५ टक्के सबसिडी तथा बीज भांडवलात २५ टक्के विना व्याज अर्थसहाय्य, वीज तथा आयकरात सवलत देण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली आहे. 
                 या भागात टेक्स्टाईल पार्क उभारा उभारण्यात आल्यास मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी व बेरोजगार युवकांना लाभ होणार आहे. येथील अल्पसंख्याक शेतकरी ते मजूर वर्ग हा आर्थिक दृष्ट्या अधिक बळकट होणार आहे. त्यामुळे हि लोकहितात्मक मागणी त्वरित मान्य करण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. या मागणीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button