ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांची पालडोह शाळेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- एकीकडे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या असता चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ही ३६५ दिवस चालणारी शाळा अजूनही चालू आहे. आज याच शाळेला चंद्रपूर जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी या शाळेला भेट दिली. सोबत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे हे सुद्धा सोबतीला उपस्थित होते.

      पालडोह ही चंद्रपूर जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा आहे.जिवती सारख्या अतिदुर्गम ,बहुल आदिवासी व नक्षल भाग म्हणून ओळखला जातो.याच तालुक्यात ही ३६५ दिवस चालणारी चालते. या नाविन्यपूर्ण शाळेला भेट देण्यासाठी व शाळा पाहण्यासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत मुल ही डिजिटल पद्धतीनं वर्गात शिकत होती. स्वतः मुल प्रोजेक्टर चा उपयोग करत मुलांना शिकवत होती. त्यांनी वर्गात भेट देऊन काय शिकत आहे याची चौकशी केली. मुलांनी त्यांना योग्य उत्तर दिली.स्क्रीन वर शिष्यवृत्तीचे काही उदाहरणं देऊन उत्तर विचारली तेव्हा मुलांनी त्याचे उत्तर दिली सोबतच सर्व मुलांना मुलांचे कौतुक म्हणून टाळ्या वाजवायला लावल्या. वर्ग ३ री व ४ थी च्या मुलांनी इंग्रजीचे वाक्य वाचन केली. मुलांचा आत्मविश्वास बघून आनंदी झाले.

       शाळेचे मुख्याध्यापक परतेकी यांनी या शाळेविषयी माहिती दिली .ही शाळा इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होती.आज या शाळेला इयत्ता १० वी ची मान्यता मिळाली आहे आहे.सोबतच ४०० लोकसंख्या असणाऱ्या शाळेत माध्यमिक शाळा होणे सोबतच १५ किमी अंतरावरुन मुल या शाळेत शिकण्यासाठी येतात याची माहिती सिंग यांना दिली.

     शाळेत येताच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन शालेय मुख्यमंत्री कू दिव्यंका बाजगीर हिने स्वागत केले. तर गिरीश धायगुडे यांचे स्वागत गट शिक्षणाधिकारी धनराज आवारी यांनी तर गट विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यपक परतेकी यांनी केले.

       सिंग यांनी पूर्णवेळ देऊन शाळेची पाहणी केली.शाळेतील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शब्द दिला. शाळेची संवाददाता कू दिव्यंका बाजगिर या मुलीने सिंग यांची मुलाखत घेतली. मुलाखत देताना त्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिली. ते सांगत होते की या शाळेतील मुलांची गुणवत्ता खूप चांगली आहे. मुलांची अध्ययन क्षमता फार चांगली आहे. ही शाळा ३६५ दिवस चालते,मुलांच्या गुणवत्तेचे योगदान शाळेचे मुख्याध्यापक तथा इथले सर्व शिक्षक यांना जाते.या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. मुलांचे मनोरंजन असो वा शिक्षण सर्व या शाळेत मिळत त्यामुळे या शाळेचे विशेष अभिनंदन केले.

       आजच्या भेटीच्या वेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दोडके,गट शिक्षणाधकारी धनराज आवारी, डॉ स्वप्नील टेंभे तालुका अधिकारी जिवती – कोरपना , डॉ शर्मा वैद्यकीय अधिकारी पाटण,विस्तार अधिकारी झोडे,विस्तार अधिकारी देठे,विस्तार अधिकारी चौधरी, विस्तार अधिकारी रामगिरकर,आरोग्य विस्तार अधिकारी बांबोळे,शाळेचे मुख्याधयापक परतेकी तथा इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये