चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

के.के.सिंग यांना पत्नीशोक

नीलम क्रिश्नकन्हैया सिंग यांचे क्राईस्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव के के सिंग यांची पत्नी नीलम क्रिश्नकन्हैया सिंग यांचे बुधवार(1 डिसेंबर)ला तुकुम येथील क्राईस्ट रुग्णालयात रात्री 9.45 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 52 वर्ष होते.
स्व.नीलम सिंग यांची अंत्ययात्रा शक्तीनगर-दुर्गापूर येथील राहत्या घरातून निघाल्यावर मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर गुरुवार(2 डिसेंबर)ला दु.2 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.के के सिंग यांनी मुखाग्नी दिल्यावर शोकसभा घेण्यात आली.
नीलम सिंग यांचे मागे एक मुलगा व एक मुलगी असा बराच व्याप्त परिवार आहे.
यावेळी उपस्थित माजी आमदार एस क्यू जमा,आमदार किशोर जोरगेवार,नगरसेवक पप्पू देशमुख,रामू तिवारी,सुनील तायडे,सिक्की यादव,मजहर अली यांचेसह कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला व सिंग परिवाराचे सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button