चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त

रेती तस्कराचे धाबे दणाणले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुरेश खडसे

जिल्ह्यातील घुग्गुस येथील वर्धा नदीचा चिंचोली घाट,नकोडा घाट,घोडा घाट,हल्या घाट व नायगाव घाट,या रेती घाटाचा मागील तीन वर्षापासून लिलाव झालेला नाही.तरीही बांधकाम युद्ध पातळीवर सुरु आहे.या कामाकरीता वर्धा नदीतून अवैधरित्या रेती तस्करी करून दोन हजार तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर विकल्या जात आहे.वर्धा नदीच्या घाटातून मोठ्या प्रमाणात रात्रौ-दिवस रेती उपसा सुरू असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल डूबत होता याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती यामुळे मंडळ अधिकारी किशोर नवले यांनी काही घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम केले होते. तरी रेती तस्करी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र दिसत होते.रेती तस्कर दिवस-रात्र वर्धा नदीच्या चिंचोली घाटा मधून रेतीचा उपसा करीत असल्याची गोपनीय माहिती मंडल अधिकारी किशोर नवले यांना मिळताच त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चिंचोली घाट येथे सकाळी 10 वाजता दरम्यान धाड टाकून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 एल 3598, एम एच 34/3562 व एमएच 34/ हे तीन ट्रॅक्टर जप्त करून नायब तहसील कार्यालया समोर लावण्यात आले. ही कारवाई मंडल अधिकारी किशोर नवले, तलाठी दुवावार, तलाठी तल्हार व तलाठी राहुल भोंगळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button