चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

शहरातील अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम

जागतिक एड्स दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही तथा अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट सिंदेवाही, संकल्प बहुउद्देशीय संस्था लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट सिंदेवाही येथे जागतिक एड्स दिन आणि अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट ची नव्याने आज पासून सुरुवात करण्यात आली. शाळा बाह्य ग्रामीण व शहरी मुलांना नर्सिंग कोर्स द्वारे उपजीविकेचे साधन निर्माण करण्याचे मुख्य उद्देश आहे असे संस्थेचे संचालक अनिल दिघोरे यांनी सांगीतले. कार्यक्रमात सहभागी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले की एड्स संदर्भात समाजामध्ये असलेल्या अनेक गैरसमज यांचीही माहीती देण्यात आली.त्याचप्रमाणे एचआयव्हीचा प्रतिबंध या विषयावरही मार्गदर्शन पर भाषण करण्यात आले या प्रसंगी
कार्यक्रमाला लाभलेले मा.डॉ. बडनोरे साहेब, डॉ. रोहन झाडे , डॉ. लाकडे डॉ. स्वप्नील गेडाम ,ढोरे सर (HIV समुपदेशक), अमोल बन्सोड ,विरेन्द्र मेश्राम (कोविड योद्धा), वनिता नालेवार(ग्रा.रु.समुपदेशक),श्रद्धा ताजने (ग्रा.रु.प्रयोगशाळा तंत्रज्ञ) श्रुष्टी कोवले (ANM), अनिल दिघोरे संचालक अद्विक नर्सिंग इन्स्टिट्यूट संचालक,सदस्य राहुल वाघाडे ,ओमप्रकाश लांजेवार व सर्व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button