होली फॅमिली स्कूल मध्ये स्काऊट अँड गाईडचे निवासी शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान होली फॅमिली स्कूलमध्ये स्काऊट एंड गाईडचा तीन दिवसीय निवासी शिबिर पार पडले, या शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. व वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यात आल या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कराटे,गुड टच बॅड टच, फर्स्ट एड मदत व ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले या तीन दिवसीय निवासी शिबिरामध्ये मुलांना सकाळच्या व्यायामाबद्दल व दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या मूलभूत गरजा समजावण्यात आल्या ११ एप्रिल ला उद्घाटन समारंभ संपन्न झाला या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्य सिस्टर दीपा व लोकल मॅनेजर नवीन बासरी व उपप्राचार्य ब्लेसी मारिया व शाळेच्या स्काऊट गाईड प्रमुख आरती सातपुते व प्रीतम चौधरी तसेच स्काऊट गाईड ट्रेनर भूषण मेडपल्लीवार व संतोष सर उपस्थित होते.
13 एप्रिल ला स्काऊट अँड गाईड चा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ,या समारोपिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय विज्ञान व कला महाविद्यालय चे विभाग प्रमुख डॉ. परवेज अली सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रदीप परसूटकर आणि शाळेच्या प्राचार्य सिस्टर दीपा व सिस्टर नवीन बास्टीन उपस्थित होते उत्कृष्ट स्काऊट सक्षम हिवरकर व सम्यक घरमाडे आणि उत्कृष्ट गाईड म्हणून ईमान अली व फाल्गुनी यांना देण्यात आला. आरती सातपुते प्रीतम चौधरी विनोद शेंडे,सपना सेलोकार,सतीश भगत,पवन चने, भूषण मेडपलिवार, संतोष सर,पम्मी मिश्रा यांनी मोलाचे योगदान दिले