ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणाबाई विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- संपूर्ण भारतामध्ये ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवर असलेल्या बहिणाबाई विद्यालय नोकेवाडा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करून दिवसभराचे शालेय कामकाज विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक होऊन सांभाळले. यावेळी विद्यालयाचे सहा.शिक्षक सतीश राठोड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व सांगितले.

यावेळी विद्यालयातील शिक्षक संघरक्षित तावडे, संतोष निखाडे, संतोष इंद्राळे, पांडुरंग कांबळे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये