चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

मनपाचे उपायुक्त गराटे यांचे आवाहन ; विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चांदा ब्लास्ट

भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022  या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून, मतदार यादी कार्यक्रमाचे अनुषंगाने 1 जानेवारी 22 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण  करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी शहरवासीयांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.  

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. त्या अनुषंगाने शहरातील मतदारांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने राणी हिराई सभागृहात सोमवारी (ता. १५) मशीद पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.  

सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पहावे, नाव आढळून न आल्यास नमुना क्र.6 सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. तसेच नवीन मतदारांनी 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे औचित्य साधून न चुकता आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन अशोक गराटे यांनी केले.  

ज्या मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करून घ्यावयाचा आहे किेंवा एकाच मतदार संघात एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थानांतरीत कररायचे आहे, त्यांनी आपला अर्ज मतदार  नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. नमुना 6,7,8, 8अ आवश्यकतेनुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी मतदार नोंदणी करावी, तसेच ज्या नागरिकांना मतदार यादीत छायाचित्रासह नावात दुरुस्ती, नवीन नोंदणी करायची असल्यास जवळच्या मतदान केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button