चांदाब्लास्ट विशेष

पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत घोळ – यादीची फेरतपासणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

प्रपत्र 'ड' यादी सदोष असल्याचा नागरिकांचा आरोप

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी 

आशिष रैच राजुरा 

भद्रावती तालुक्यातील पाटाळा राळेगाव गट ग्रामपंचायती मधे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब गरजू नागरिकांना घरे बांधुन देण्यात येणार असुन ह्यासाठी ग्रामपंचायतीने तयार केलेली प्रपत्र ‘ड’ ची यादी सदोष असुन ह्यात गरीब गरजू व कुडाच्या अथवा कच्च्या घरात वास्तव्यास असलेल्या नसेल लोकांची नावे गहाळ असुन ह्या यादीची फेरतपासणी करून गावांत प्रत्यक्ष मोका चौकशी करून अद्ययावत यादी तयार करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी संवर्ग विकास अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येकाला घर मिळावे या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत . ज्या लोकांची घरे कुडाची, विटा मातीची , कौलारू आहेत त्यांना स्लॅबचे घर देण्याचा निर्णय या योजनेतून करण्यात आला आहे मात्र ह्या योजनेची अंमलबजावणी करताना बऱ्याचदा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चूक होऊन ज्याला पक्के घर आहे त्यालाच पुन्हा घर दिले जाते तर घर नसणाऱ्यांना काही मिळत नाही. त्यामुळे गावात खरोखरच कोणाला घर नाही, कोणाला घराची नितांत आवश्यकता आहे याची यादी बनवुन ग्रामपंचायत मार्फत मंजूर करून पुढे पाठवायची आहे त्यानुसारच सादर याद्या असून त्यात प्रपत्र ड ची यादी आहे .

ग्रामपंचायतीने पाठविलेल्या यादीची पडताळणी करून पुढे मंजुरीसाठी पाठवायची आहे मात्र पडताळणी करताना मौका चौकशी व सत्य परिस्थिती लक्षात न घेता अनेक गरजू लाभार्थ्यांना अपात्र करून त्यांना घरकुल पासून वंचित ठेवले असल्याचे नागरिकांनी गट विकास अधिकारी ह्यांना दिलेल्या निवेदनातून निदर्शनास आणून दिली.

नागरिकांच्या मागणी नंतर गट विकास अधिकारी यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे प्रपत्र ‘ड’ यादीची पडताळणी करताना मौका चौकशी व वस्तुस्थिती बघूनच ग्रामपंचायत या कर्मचारी न करता वरील अधिकारी यांनी चौकशी करावी व गरजू लोकांना घरकुल योजनेचा योग्य लाभ मिळावा अशी राळेगाव येथील मागणी प्रभाकर थेरे, किशोर भट, कमलेश खामनकर, राकेश खोके, शंकर खैरे, शंकर थेरे, सुरेश चतपल्लीवर ह्यांच्या सह इतर ग्रामस्थांनी केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button