ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर उपविभागीय कार्यालयापुढे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन इदगाह जागा कायम करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

बलारपूर तालुक्याच्याक्षेत्रात असलेल्या मौजा कोठारीयेथील 70 ते 75 वर्षापासून मुस्लिम समाजाच्या पूर्वजांनी बांधलेल्या सर्वे नंबर 24 महसूल विभागाच्या शासकीय परमपोक जमीन O – 52 आर जागेचा वापरमुस्लिम समाज इदगाह म्हणूनधार्मिक कार्यासाठी वापर करीत असताना तहसीलदार बल्लारपूर यांनी या जमिनीचे निष्कासन आदेश दिनांक 17 4 2023 ला दिल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये असंतोष वाढला यापूर्वी ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे या परिसरातील अल्पसंख्यांक कल्याण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत परिसर विकसित व्हावाव लगत असलेल्या मुस्लिम कब्रस्तान करिता स्थानिक विकास निधीतून कामे करण्यात आली मात्र या जागेबद्दल निष्कासन आदेश निघाल्याने मुस्लिम समाजाने आंदोलन करून ही जागा इतका करिता कायम करावी.

तसेच तहसीलदार यांचे निष्कासन आदेश रद्द करावे या मागणीसाठी श्री आबिद अली सहसचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसयांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या कार्यालया पुढे धरणे आंदोलन देऊन शेकडो मुस्लिम सकल समाजाने निष्कासनआदेश रद्द करावा इदगाहची जागामुस्लिम समाजाला देण्यात यावीत्या मागणीसाठी मोहम्मद गॅस इरफान शेख नासिर बक्ष कुतुबुद्दीन सिटीइरशाद शेख रियाज शेख आरिफ शेख मुस्ताक शेख फिरोज पठाण यांचे सह मोठ्या प्रमाणात समाज कार्यकर्ते उपस्थित होते उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निष्कर्षण आदेश रद्द करण्याची व जागा देण्याची मागणी शिष्य मंडळांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये