चांदाब्लास्ट विशेष

स्पोर्टस् क्लबच्या नावाने सुरू असलेले जुगार अड्डे बंद करा – सुरज ठाकरे ह्यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार - अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी 

आशिष रैच राजुरा 

राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सिमेंट कंपनी व कोळसा खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत तथा राजुरा लगतच तेलंगणा राज्याची सीमा असल्याने परप्रांतातून येऊन राजुरा तालुक्यामध्ये तिकडच्या तथाकथित लब्धप्रतिष्ठित लोक जुगार खेळण्यासाठी राजुरा तालुक्यात येत असुन आपला छंद पुर्ण करत असुन ह्याठिकाणी जुगारासह नियमबाह्य पद्धतीने दारूसुद्धा पुरविण्यात येत असुन जुगारी लोकांना मनसोक्त खेळता यावे ह्यासाठी चक्क त्यांच्या खाण्याची सोय सुद्धा करण्यात येत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांनी केला आहे.

आज जिल्हाधिकाऱ्यांना ह्या संदर्भात दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी आरोप केला की राजुरा तालुक्यात काही राजकीय नेते व व्यापारी ह्यांच्या संगनमताने स्पोर्ट्स क्लबच्या नावावर मोठे जुगार अड्डे सुरू आहेत. विशेष म्हणजे मनोरंजनाच्या नावावर स्पोर्ट्स क्लब करता परवानगी घेऊन त्यासाठी असलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्याची लेखी हमी देऊन स्पोर्ट्स क्लबची परवानगी मिळविण्यात आली होती.

ह्या स्पोर्ट्स क्लबच्या नियमांनुसार इथे कुठल्याही प्रकारचा जुगार खेळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले मात्र वास्तविकता वेगळीच असल्याचे आढळून येत असुन ह्याठिकाणी सर्रास जुगार खेळविण्यात येतो. ह्या संदर्भात स्थानिक पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला माहिती असुनही राजकिय नेत्यांचा क्लबला असलेला आशिर्वाद तसेच व्यापाऱ्यांच्या धनशक्तिमुळे पोलीस प्रशासन अर्थपुर्ण डोळेझाक करत असुन अधिकाऱ्यांशी असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणी मुळे हे क्लब संचालक बिनधास्तपणे कायद्याचे उल्लंघन करून करोडो रुपयांचा जुगार भरवतात.

ज्यामध्ये परप्रांतातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जुगार खेळण्यात करता येत असतात वारंवार स्थानिक प्रशासनाला तक्रार केल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आपण  थेट जिल्हाधिकार्‍यांना अशा लोकांचे परवाने रद्द करण्या करता विनंती केली आहे असे सुरज ठाकरे ह्यांनी सांगितले आहे.

याशिवाय राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नाल्या लगतच्या रेतीच्या उपशाचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याने नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे या सर्व रेती तस्करांवर आळा घालण्यात करता प्रशासन कासव गतीने काम असल्याचा ठपका सुरेश ठाकरे यांनी त्यांच्या निवेदनात स्थानिक महसूल विभागावर ठेवला आहे. याशिवाय रेती तस्करी संदर्भात तलाठी पटवारी तहसीलदार यांना रात्री फोन केले असता कोणीही फोन उचलत नसल्याची तक्रार देखील सुरेश ठाकरे यांनी यांच्या निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केली आहे.

सुरज ठाकरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आता कुठेही रेती तस्करी दिसल्यास किंवा आढळल्यास थेट मला संपर्क करा मी कार्यवाही करेल असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी वरखेडकर यांनी ठाकरेंना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button