ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार यांचे नवे नाटक “शाम्या”लवकरच प्रदर्शित होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कवी, पटकथा लेखक, दिग्दर्शक, अभिनय या सगळ्याच पातळीवर आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा तरुण कलाकार म्हणजेच लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार.  अनिकेत परसावार या अवलिया कलाकाराचं नाव मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात नवे तर संपुर्ण महाराष्ट्रात खूप गाजत आहे. दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावे ही महत्वाकांशा प्रत्येक रंगकर्मीला असते आणि हीच आशा अनिकेतच्या मनाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भिडली. या कलाकाराने  आधी पथनाट्य, मग दोन अंकी नाटक, त्या नंतर विविध चित्रपट, या सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता परत नाटकांकडे युवा कवी, लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी वाट धरली आहे. तब्बल ८ वर्षां नंतर दिग्दर्शक अनिकेत परसावार हे नाट्य क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या लेखन आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवायला येत आहे. या वर्षी दिवाळी पासून त्यांनी स्वतः लिहिलेलं आणि दिग्दर्शन केलेलं शाम्या हा ३ अंकी झाडीपट्टी नाटक प्रेक्षकांसमोर येणार आहे. नाटकातली कथा ग्रामीण भागातील दोन तरुण प्रियकराची आहे. ज्यांची समाजातील काही लोकांन द्वारे हत्या करण्यात येते. या हत्येचा शोध पोलिस अधिकारी घेतात की नाही? त्या दोघांना न्याय मिळतो की नाही? खूप गुंतागुंतीत प्रश्न सोडवीत असलेला असा हा सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. या आधी झाडीपट्टी नाटकांमध्ये असे प्रयोग झालेले नाही. त्या मुळे रसिका प्रेक्षकांना हा नाटक बघायला नक्कीच आवडेल. या नाटका मध्ये २ प्रेम गीत व १ लावणी गीत आहे. या नाटकाचे गीतकार व संगीतकार महालिंग कंठाळे आहेत. या नाटकाच्या निर्मितीची सुरुवात झाली आहे. शाम्या या नाटका सोबतच अनिकेत दर महिन्याला नाटक व चित्रपट कार्यशाळा घेत असतो. सध्या तो विदर्भाच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या “डफ” या फिचर फिल्म मध्ये सक्रिय आहे. याचं सोबत तो एक उत्तम कवी सुध्दा आहे. याचं वर्षी त्यांनी लिहलेला ‘ख़्वाबों के कमरे में’ हा हिन्दी-उर्दू भाषेचा काव्यसंग्रह प्रकाशित झालं आहे. हा काव्यसंग्रह अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे.

झाडीपट्टी नाटकांमध्ये एक आकृतीबंध नाटक चालतो असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. इथे नाटक करत असलेल्या लोकांना परिवर्तनाची आणि नवीन विचारधारणावाल्या नाट्य प्रयोगांची सवय नाही आहे. पण परिवर्तन हे माणसाचं जीवनाचा एक अवलोकिक भाग आहे. कुठली पण कलाकृती आधी नवीन असते आणि या नाटकाचे भविष्य रसिक मायबाप प्रेक्षक ठरतील. आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये