गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुक 2024 संबंधाने SST पथकाने रोख रक्कम केली जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील लोकसभा निवडणुक 2024 संबंधाने SST पथक समृध्दी टोल क्रं. 4 येळाकेळी येथील SST पथक कार्यरत पोलीस अंमलदार/1793 कृपाशंकर नरुले नेमणुक पोलीस मुख्यालय वर्धा व पथक महसुल कर्मचारी श्री एस. डी. गायकवाड, ग्राम विकास अधिकारी श्री एस.जी.धोपटे, एक व्हीडीओग्राफर व पोशि /1793 यांनी दि. 04/04/2024 रोजी SST पॉईंटवर चेकींग दरम्यान एक चारचाकी वाहन क्रं. MH 49 U 1686 या वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनाच्या झडतीमध्ये 700000 /- रुपये, रोख रक्कम 500/- रुपये नोटांचे एकुण 14 बंडल स्वरुपात मिळुन आले.

सदर वाहन चालक 1) विशाल गुरनुले, वय 27 वर्ष रा. भद्रावती जि. चंद्रपुर असा असुन वाहनामध्ये 2) कुणाल केशव टापरे वय 25 वर्ष रा. भद्रावती जि. चंद्रपुर 3) राजु शंकर भुजाडे, रा. मारेगांव जि. यवतमाळ 4) अरविंद रामदास चौगुले रा. मारेगांव जि. यवतमाळ असे हजर होते. सदर रोख रक्कम बाबत चारही इसमांना पैसे कोठुन आणले याबाबत पथकाने माहीती विचारली असता त्यांनी योग्य माहीती दिली नाही. त्यामुळे सदर माहीती पथकाने ठाणेदार सावंगी मेघे पोलीस स्टेशन यांना कळविली. त्यावेळी ठाणेदार सावंगी पोलीस स्टेशन संदिप कापडे व पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी पोहचले त्यानंतर दोन पंचासमक्ष पंचनामा करुन 700000 /- रुपये, ज्यामध्ये 500/- रुपये नोटांचे एकुण 14 बंडल जप्त करण्यात आले.

तसेच नमुद वाहन व यातील 1) विशाल गुरनुले, वय 27 वर्ष रा. भद्रावती जि. चंद्रपुर 2) कुणाल केशव टापरे वय 25 वर्ष रा. भद्रावती जि. चंद्रपुर, 3) अरविंद रामदास चौगुले रा. मारेगांव जि. यवतमाळ यांना रोख रक्कम 700000 /- रुपये, सह पुढील कारवाई करीता तहसिल कार्यालय वर्धा यांचेकडे पाठविण्यात आले. सदर मिळालेली रोख रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय वर्धा येथे जमा करण्यात आली. सदर रकमेबाबत पुढील चौकशी सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये