चांदाब्लास्ट विशेष

कोरम्बी(नवेगाव भु) येथील युवा परिवर्तन संघटनेच्या ३१ कार्यकर्त्यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश

कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी पंजाचा दुपट्टा देऊन केले स्वागत

चांदा ब्लास्ट:: प्रमोद मशाखेत्रे(प्रतिनिधि)

मुल- भाजपा विचारसरणीशी मिळवुन घेत असलेल्या कोरम्बी येथील युवा परिवर्तन संघटनेच्या ३१ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कांग्रेसनेते CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये प्रवेश केला. नवेगाव भुजला येथील माजी सरपंच सुमीत पा. आरेकर आणि संतोष चावरे यांच्या पुढाकाराने त्यांचेकडून मिळत असलेल्या सहकार्याने कांग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कर्त्यांनी बोलून दाखविले. प्रवेश कर्त्यांमध्ये नवेगाव(भु) चे ग्राम पंचायत सदश रजनीकांत कीनेकर, कोरम्बीचे प्रमोद पोर्टे,नानाजी धांदरे,विनाजी नाहगमकर, हरिदास नाहगमकर, संजू गेडाम,रवींद्र नाहगमकर, एकनाथ पोटे,तुमदेव भोयर,विनोद पोटे,लंकेश पोटे,देवराव पोटे,चेतन झाडे,राजू गेडाम,ज्ञानी नाहगमकर, धाडुजी पोटे,नवनाथ नाहगमकर, विनाजी गेडाम,श्रीरंग नाहगमकर, ओमदेव चांदेकर,विनोद पोटे,केशव नाहगमकर, सुनील बावणे,गजानन जम्पलवार, संतोष गेडाम,अरुण गेडाम,दुर्गेश पोटे,बाळा मेश्राम,किशोर बावणे,आशिष नाहगमकर, देवानंद पोर्टे,गुड्डू चांदेकर यांनी प्रवेश केल्याने CDCC बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रवेश कर्त्यांच्या गळ्यात कांग्रेसचा दूपट्टा टाकून स्वागत केले.आणि कुठलेही काम आपले अडणार नाही अशा शब्दात भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित असलेल्या कांग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका सरपंच समितीचे अध्यक्ष तथा संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे,हसन वाढई,कांग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी,सुरेश फुलझेले, चंदू चतारे, यांनीही प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनशाम येनुरकर यांनी केले.संचालन ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गुरुदास चौधरी, यांनी केले तर आभार शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले. ३१ कोरम्बी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतेवेळी कोरम्बी ग्रामस्थ माजी सरपंच मोरेश्वर नाहगमकर, विकास सदोकर,दशरथ चावरे,बालाजी चुदरी,प्रफुल मोहरकर,अजय खोब्रागडे,सुरेश चावले,नरेंद्र बोरकुटे,कुमार वाळके,शालीक नाहगमकर, केशव नाहगमकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button