ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगर महिला मोर्चा तर्फे शक्तीवंदन मॅराथॉन

4 मार्च ते 6 मार्च पर्यंत आयोजन ; रन फॉर नेशन,रन फॉर मोदी उपक्रम

चांदा ब्लास्ट

महानगर भारतीय जनता पार्टी अंतर्गत असलेल्या महानगर महिला मोर्चा तर्फे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 दिवसीय शक्तीवंदन कार्यक्रमाचे आयोजन 4,5 व 6 मार्चला करण्यात आले आहे.मॅराथॉन 2024 या उपक्रमाची सुरवात 4 मार्चला सकाळी 7 वाजता केली जाणार आहे.महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात येत असून ‘रन फॉर नेशन,रन फॉर मोदी’अशी संकल्पना घेऊन मातृशक्तीला वंदन केले जाणार आहे.

या उपक्रमासाठी वयोगट 14 ते 45 व 45 च्यावर वयाच्या महिला असे 2 गट तयार करण्यात आले आहेत. 4 मार्च 2024 सकाळी 07 वाजता मॅरोथॉनची सुरवात गांधी चौक येथून होणार असून जटपुरा गेट ते गिरणार चौक व परत गांधी चौक येथे मॅराथॉन समाप्त होईल.दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असून सर्वांना सहभाग प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.

5 मार्चला मोटार सायकल रॅली

मोटरसायकल रॅलीचे आयोजन 5 मार्चला सायं 4 वाजता करण्यात आले असून शिवाजी चौक ते कोतपल्लीवार पेट्रोल पंप असा प्रवास रॅलीचा असणार आहे.

6 मार्चला पंतप्रधान नरेन्द्र मोदींचे संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीवंदन निमित्य विशेषत्वाने महिलांना संबोधित करणार असून महानगरातील 5 मंडळात याचे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था महिला मोर्चा तर्फे करण्यात आली आहे.

मॅरॉथॉन व मोटारसायकल रॅलीसाठी इच्छुकांनी महिला मोर्चाच्या शितल गुरनुले (7058074604,) माया उईके (7499671537), स्मिता रेभनकर (9763643703),शिला चव्हान (9881683901) यांचे सोबत संपर्क साधावा असे आवाहन सुषमा नागोसे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये