ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गवराळा वासीयांनी मरणासन्न गाईचे वाचविले प्राण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

भद्रावती येथील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेने व जागरूक महिला शालू हजारे व विद्या खडसे यांनी भूतदया दाखवीत एका भटक्या व मरणासन्न गाईला जीवदान दिले. एका भटक्या तथा म्हाताऱ्या जखमी व मरणासन्न अवस्थेत असलेल्या गाईला पशुवैद्यकांना बोलावून त्यांच्याद्वारे गायीवर उपचार करून तिचे येथील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राण वाचविले.

या गाईला गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लिमेश माणूसमारे यांनी दिली आहे. शहरातील गवराळा येथे एका मोकळ्या जागेवर एक जखमी मरणासन्न अवस्थेत असलेली गाय शालू हजारे या महिलेला आढळून आली. त्या महिलेने चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे यांना याची माहिती दिली. माहिती कळतात माणूसमारे यांनी लगेच आपले सहकारी वैभव खडसे यांना घेऊन घटनास्थळ गाठले.

पाहणी केल्यानंतर सदर गाय जखमी व मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोडे यांना याची माहिती दिल्यानंतर ते आपले सहकारी डॉक्टर कांबळी व मदतनीस जय चौधरी यांना घेऊन घटनास्थळावर लागलीच दाखल झाले. त्यांनी सदर गाईला इंजेक्शन व औषधे देऊन तिच्यावर योग्य ते उपचार केले व तिला खाऊ घातले. या गाईला पुढील देखरेखीसाठी गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात येईल अशी माहिती यावेळी लिमेश माणूसमारे यांनी दिली आहे. त्यांनी दाखवलेल्या या भूतदयेबद्दल माणूसमारे व पशुवैद्यकीय पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये