ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राध्यापकांच्या स्थान निश्चिती प्रक्रियेत पारदर्शीपणा व काल मर्यादा आणाव्यात

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सलग्नित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांच्या स्थान निश्चिती प्रक्रियेत अनेक अडचणी येत असून स्थान निश्चिती प्रक्रिया पारदर्शी होण्याच्या दृष्टीने संपूर्ण प्रक्रियेची किमान व कमाल मर्यादा निश्चित करून नागपूर विद्यापीठाप्रमाणे यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाने परिपत्रक काढावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे व संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावार यांनी निवेदनाच्या माध्यमातून कुलगुरू कडे गेली आहे.

       महाविद्यालयीन शिक्षकांना स्थान निश्चिती प्रक्रियेत विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांची स्थान निश्चिती नियोजित वेळेवर होत नसल्याने प्राध्यापकांना मानसिक व आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. महाविद्यालयीन शिक्षकांचे मानसिक व आर्थिक शोषणाला प्रतिबंध लावण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी यासंदर्भात परिपत्रक काढलेले आहे व त्या परीपत्रकात स्थान निश्चिती प्रक्रियेच्या किमान व कमाल कालावधीचे टप्पे निश्चित करून दिलेले आहे

        त्याचप्रमाणे आपल्या गोंडवाना विद्यापीठाने देखील पात्र शिक्षकाच्या स्थान निश्चिती बाबत प्राप्त प्रस्तावावर महाविद्यालय स्तरावर एक महिन्याचे आत कार्यवाही व्हावी तसेच पात्र शिक्षकांचे प्रस्ताव विना विलंब महाविद्यालयाने विद्यापीठाकडे अग्रेषित करावे विद्यापीठाकडून त्वरित समिती गठित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच महाविद्यालयाने विद्यापीठाकडून समिती प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत शासन प्रतिनिधी साठी विभागीय सहसंचालक यांना महाविद्यालयाने पत्र पाठवावे तसेच स्थान निश्चिती मुलाखत झाल्यानंतर एक आठवड्याच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे अग्रेषित करण्यात यावा आणि वरील संपूर्ण प्रक्रियेचा कमाल व कालावधी विद्यापीठाने निश्चित करून त्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाने एक स्वतंत्र परिपत्रक काढावे अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने केली आहे या संदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढून शिक्षकांचे स्थान निश्चिती प्रक्रियेत पारदर्शीपणा आणण्यासाठी किमान व कमाल मर्यादा ठरऊन त्याचप्रमाणे महाविद्यालयांना निर्देशित करून महाविद्यालयातील शिक्षकांच्या मानसिक व आर्थिक शोषणाला प्रतिबंध घालावा अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये