चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

कुनघाडा (रै) येथे विकासकामांचे भूमिपूजन

कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे यांचे हस्ते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. स्मृती वावासनिक, गडचिरोली

स्थानिक जिल्हा परिषद क्षेत्रातील कुनघाडा (रै) येथे कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे यांचे हस्ते कृषी गोदाम, सिमेंट काँक्रीट रस्ता व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच अविनाश चलाख, सरपंच अल्का धोडरे, उपसरपंच अनिल कुनघाडकर, ग्रा. पं. सदस्य दिलीप दुधे, ग्रा. पं. सदस्य रोशन दुधबळे, ग्रा. पं. सदस्य विनोद दुधबळे, सुनंदा उडाण, दीपाली घोंगडे, अल्का गव्हारे, पांडुरंग वासेकर, धर्मदेव उडाण, मधुकर टिकले, भाष्कर बुरे, दीपक भांडेकर आदी उपस्थित होते.

स्थानिक जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधी तथा जि. प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे यांच्या प्रयत्नातून कुनघाडा बाजारपेठ येथे शेतकऱ्यांचा शेतमाल साठवून ठेवण्यासाठी आकांक्षित जिल्हा

निधीमधून २६ लाख रुपये मंजूर करून सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भीसार वॉर्डात सिमेंट रस्ता व पशुवैद्यकीय दवाखान्यात संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात येऊन सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button