मरकलमेटा येथे जनआक्रोश आंदोलनाची सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- सकल मातंग समाजाच्या वतीने ३० मे ला आझाद मैदान मुंबई येथे अनु जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ व्हावे यासाठी जनआक्रोश आंदोलन होणार आहे. त्याची प्रसिद्धी आणि प्रचार सभा नुकतीच मरकलमेटा येथे पार पडली. सभेला मुख्यमार्गदर्शक म्हणून राज्यसमनवयक डॉ. अंकुश गोतावळे, व्यंकटी तोगरे, विजय गोतावळे, दीपक गोतावळे उपस्थित होते तर सभेचे अध्यक्ष अशोक लोणीकर हे होते. सभेचे प्रास्ताविक पापु सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन श्री उत्तम कांबळे यांनी तर सूत्रसंचालन श्री रवी कांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबू कांबळे, माधव जाधव, शिवाजी कांबळे, चंदर गायकवाड, गोरोबा राजूरकर, रंगराव जाधव, संजय सूर्यवंशी, मोकिंद कांबळे, मारोती कांबळे, वैजू सूर्यवंशी, रणजित सूर्यवंशी, धोंडिबा कांबळे, अंगद कांबळे, रणजित गोटमुकले,हनुमंत सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम केले.सभेस गावातील महिला, युवक, युवती ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.