चांदाब्लास्ट विशेष

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या धम्म ध्वजाचे ध्वजारोहण

दीक्षाभूमीला अभिवादन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवेश

चांदा ब्लास्ट: शेखर गजभिये, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरात 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध धर्माचे प्रतिक असलेल्या धम्म ध्वजाचे ध्वजारोहण समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, नागदिपंकर डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, नामदेव सुटे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, डॉ. ए. पी. जोशी, समता सैनिक दलाचे कमांडर पृथ्वीराज मोटघरे, निवडक भिक्खूगण, समता सैनिक दलाचे निवडक सैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. रवींद्र तिरपुडे, मधुकरराव मेश्राम, चंद्रहास सुटे, भूपेश वऱ्हाडे, शरद मेश्राम, सतिश रामटेके, प्रसन्ना मुल, प्रमोद गेडाम, देवांची रंगारी, बबलू दखणे आणि स्मारक समितीचे निवडक सदस्य उपस्थित होते.
नागपूरच्या भूमीतील पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ऊर्जा, मानवतेचे विचार, बौद्ध विचार जगात या पवित्र भूमीवरून घेऊन जाण्याकरिता देशातील, राज्यातील नव्हे तर जगातील लाखो अनुयायी आजपर्यंत या पवित्र भूमीवर येत होते. दुर्दैवाने मागील दोन वर्षापासून देशात व जगात कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने दीक्षाभूमी स्मारक समितीने समाजाला बाबासाहेबांच्या अनुयायांना या पवित्र दीक्षाभूमीवर न येण्याचे विनंतीपूर्वक आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाने उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल स्मारक समितीने आंबेडकरी जनतेचे आभार मानले. 7 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना मंदिर, मशीद, गुरुद्वारे, चर्च, बुद्ध विहार, जैन मंदिर कोरोनाचे नियम पाळून खुले करण्याचे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार दीक्षाभूमीचे द्वार सुरू करण्यात आले. यावेळी सुद्धा कोरोनाचा पादुर्भाव विचारात घेता स्मारक समितीने दक्षता घेतली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या देशात अनेक अन्याय अत्याचार सहन करावा लागला हे सर्व विष प्राशन करूनसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर अमृताचा वर्षाव केला.आपण याच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण आपल्या आरोग्याची, परिवारांची, पर्यायाने देशाची समाज व्यवस्था धोक्यात येईल. याची दक्षता घेऊन शक्यतो घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे आहे. पवित्र दीक्षाभूमीला अभिवादन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र गर्दी करू नये असे आवाहन स्मारक समितीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button