चांदाब्लास्ट विशेष

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने निकाली काढा

आ. परिणय फुकेंनी घेतली राज्यपालांची भेट

चांदा ब्लास्ट:
शेखर गजभिये, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या, याबाबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आमदार डॉ. परिणय फुके व नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी भेट घेतली.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च, एप्रिल व मे या कालावधीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकाच्या नुकसानीसाठी डावलले गेले आहे. ओल्या दुष्काळामुळे सर्वस्व गमावलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मदत जाहीर  व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये धान विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये धान खरेदी केंद्रांमध्ये बरीच अनियमितता समोर येणे, बारदाण्याअभावी शेतकऱ्यांच्या धानाची उचल होत नसणे, गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान ठेवायची वेळ आली आहे. यावर लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावे अशीही मागणी यावेळी आ. फुके यांनी राज्यपालाकडे केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीमध्ये समाजाचे नुकसान झाले असून राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचा कायदा तातडीने मंजूर करावा, याकरिता आपण राज्य सरकारला सूचना कराव्या अशी मागणी चर्चेदरम्यान राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली. प्रसंगी या सर्व प्रश्नांवर आपण स्वतः जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button