चांदाब्लास्ट विशेष

टीका करणे हेच भाजप नेत्यांचे काम – नाना पटोले

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाता चांगली व्हावी यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर

चांदा ब्लास्ट शेखर गजभिये, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाता चांगली व्हावी यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. असे असताना भाजप नेते टीका करण्याचे काम करीत आहेत. १५ हजार कोटीचे नुकसान होऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मदत करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी होती. पण ते सोडून भाजप टीका करीत आहे. टीका करणे हा भाजप नेत्यांचा ‘जॉब’ असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले की, केंद्राकडून कशी अधिक मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक मदत देता येईल याकडे भाजप नेत्यांनी लक्ष घालावे. तसे केल्यास अधिक मदत करता येईल, नुसती टीका करीत बसू नये असा सल्लाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना दिला. ते माध्यमांशी नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

कोरोनामुळे राज्य सरकारकडे उपलब्ध आर्थिक स्रोतातून ही मदत करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात आर्थिक स्रोत सुधारल्यानंतर आणखी मदत करावी, अशी मागणी काँग्रेस करणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ओबीसी मंत्री नाराज असल्याचे कळले आहे. यावर बोलताना म्हणाले की, मी स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी बोलणार आहे. दबाव आणून भटक्या विमुक्त जातींना निधी मिळावा हीच भूमिका असेल. त्यासाठी प्रयत्न करू असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button