ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारू एकूण 2 लाख 13 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 05.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक हे उपविभाग वर्धा येथील परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली वरून 1) आरोपीतांनवर वार्ड न. 1 पाण्याचे टाकी जवळ बोरगाव मेघे, वर्धा येथे त्याचे घरासमोर नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता यातील आरोपी 1) रंजीतसिंग उपेन्द्रसिंग थुरवाल वय 23 वर्ष 2) विधीसंघर्षीत बालक दोन्ही रा. वार्ड न. 1 पाण्याचे टाकी जवळ बोरगाव मेघे, वर्धा जि. वर्धा यांचे ताब्यातुन 1) एक काळया लाल रंगाची हीरो होन्डा कंपनीची फॅशन दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 32 आर 3180 अंदाजे किंमत 70,000/- रू व त्या दोघाचे मधात प्लॉस्टीक चुंगडी मध्ये रॉयल स्टँग, ऑफीसर चाईस ब्लु ऑफीसर चाईस, देशी दारू, टुबर्ग, कपनीच्या दारूच्या अश्या वेग -वेगळ्या कपंनीच्या विदेशी दारूच्या शिश्या असा जु. की 98,100/- रू चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

2) तसेच आरोपीतांनवर हनुमान नगर, वर्धा येथे त्याचे घरासमोर नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता यातील आरोपी 1) वेदांत जितेन्द्र गडकरी वय 20 वर्ष 2) पारीकेत विजय खडसे वय 22 वर्ष दोन्ही रा. वार्ड न. 29 हनुमान वर्धा जिवर्धा यांचे ताब्यातुन १) एक काळया रंगाची निळा पटटा असलेली हीरो होन्डा कंपनीची स्पेलेन्डर दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 32 सी. 3669 अंदाजे किंमत 50,000/- रू व त्या दोघाचे मधात प्लॉस्टीक चुंगडी मध्ये रॉयल स्टँग, ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, देशी दारू, टुबर्ग, कपंनीच्या दारूच्या अश्या वेगवेगळ्या कपंनीच्या विदेशी दारूच्या शिश्या असा जु. की 1.15,500/- रु चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

दोन्ही गुन्हयातील आरोपीतांना सदरची विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता विदेशी दारूचा माल हा सावंगी आसोला जि. नागपुर हायवे रोडवरील Leopold-9 नावाने असलेल्या रेस्टॉरन्ट व बार चे चालक/मालक नयन चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि नागपुर यांचे बार मधुन आणला आहे. वरून आरोपी नयन चितंलवार रा. सावगी आसोला नागपुर यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हयात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असताना सुध्दा वर्षा जिल्हातील आरोपीतांन दारूचा माल देवुन त्यांना सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने दोन्ही गुन्हयात आरोपी बनविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरुध्द 1) अपराध क्रमांक 207/2024 कलम 65 अई, 77 अ 82, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. 2) अपराध क्रमांक 208/2024 कलम 65 अ ई. 77 अ, 82, 83, म. दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे वर्षा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि. मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, रवि नरूले, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये