चांदाब्लास्ट विशेष

वन्यजीव सप्ताहानिमित्त वनभ्रमंतीचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील ‘ग्रीन प्लनेट नेचर क्लब’ च्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट’: सुधाकर श्रीरामे (ता. प्रर). नागभीड

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील ‘ग्रीन प्लनेट नेचर क्लब’ च्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कोरपेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये घोडाझारी अभयारण्यातील वन्यजीव यांच्या विविध प्रजातीचा अभ्यास व्हावा या हेतूने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक 5 आक्टोंबर रोजी वन भ्रमणाचे आयोजन करण्यात आले.
या वनभ्रमंतीमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. विकास मोहतुरे, डॉ. आर. जे. रुडे, मॅडम डॉ. चव्हाण, प्रा. धनंजय मडावी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या वनभ्रमंती दरम्यान विविध कीटक कोळी व पक्षांच्या प्रजाती यांची ओळख पटवून देऊन त्याचे पर्यावरणातील महत्व व त्यांचे संवर्धन या विषयी जनजागृती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button